पुण्यात (Pune) एक महिलेची केक ऑर्डर करताना आर्थिक फसवणूक झाल्यचा प्रकार समोर आला आहे. 400 रूपयांच्या केकची ऑनलाईन ऑर्डर करताना तिला 1.67 लाखांचा फटका बसला आहे. हा प्रकार पुण्यातील मोशी भागातील आहे. दरम्यान इंटरनेट वर बेक शॉपचा कर्मचारी असल्याचं भासवून गंडवलं. सध्या या प्रकरणी MIDC Bhosari Police Station मध्ये एफआयआर रजिस्टर करण्यात आली आहे.
Hindustan Times च्या माहितीनुसार, महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये तिची 400 रूपयांच्या केक साठी ऑनलाईन ऑर्डर देताना 1.67 लाखांची लूट झाली आहे. 4 मे दिवशी तिने ऑनलाईन बेकरी शॉप शोधत होती. तिला केक ऑर्डर करायचा होता. यामध्ये तिला एका केक शॉपचा नंबर मिळाला. त्यावर संपर्क साधून केकही ऑर्डर केला. हे देखील नक्की वाचा: Cyber Fraud: ऑनलाइन लोन अॅपवरून 50 हजारांचे कर्ज घेणे तरूणाला पडले महागात, कर्ज माफियांनी 4.28 लाख रुपयांचा लावला गंडा .
बेकरी शॉप चा कर्मचारी असल्याचं भासवत त्याने तिला कॉल केला आणि बॅंकेचे डिटेल्स दिले आणि 400 रूपयांचा व्यवहार करण्यास सांगितले. ऑनलाईन ट्रान्सफर दरम्यान तिला काही तांत्रिक गडबड झाल्याचं जाणवलं. मग तिला क्यूआर देऊन व्यवहार करायला सांगितलं. हा व्यवहार तिच्या अकाऊंट मधून फसवणूक झालेल्याच्या अकाऊंट मध्ये झाला.
कोड स्कॅन करून 2000 रूपये पहिल्यांदा गेले. जेव्हा तिने जास्त पैसे गेल्याचं सांगितलं तेव्हा समोरच्या व्यक्तीने उरलेले पैसे रिफंड करतो असं सांगितलं. पण त्या महिलेला केवळ 10 रूपये रिफंड दिला आणि 1.67 लाख काही क्षणात तिच्या अकाऊंटमधून उडाले. यासाठी सहा ट्रान्झॅक्शन झाली. सध्या याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.