Online Share Trading Fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

सायबर क्राईम पोलिसांनी (Cyber Crime Police) मुंबई (Mumbai) येथून दोघांना अटक केली आहे. या दोघांवर एका सॉफ्टवेअर अभियंता (Software Engineer) आणि त्याच्या कुटुंबाची 5.14 कोटी रुपयांची ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा (Online Share Trading Fraud) करुन फसवणूक केल्याचा आरोप आहे. हमप्रीतसिंह रंधावा (वय-34) आणि विमलप्रकाश गुप्ता (वय-45) अशी या दोघांची नावे आहेत. दोघेही विरार येथील राहणारे आहेत. यापैकी रंधावा हा सुरक्षारक्षक तर विमलप्रकाश हा खासगी शिक्षक म्हणून काम करतो. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये या दोघांनी पीडितांकडून पैसे उकळण्यासाठी अनेक बँक खात्यांचा वापर केल्याचे पुढे आले आहे. त्यांना कोर्टासमोर हजर केले असता त्यांना 18 जून पर्यंतची पोलीस कोठडी मिळाली आहे. रंधावाने आपले बँक खाते 10,000 रुपयांना विकल्याचे कबूल केले, जे गुप्ताने नंतर दुसऱ्या साथीदाराला विकले.

फसवणूक करण्यापूर्वी शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण

आरोपींनी तक्रारदाराला जानेवारी महिन्यात एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. या ग्रुपमध्ये ऑनलाइन शेअर ट्रेडिंग आणि नफा याविषयी चर्चा सुरू होती. तक्रारदाराची गुंतवणूक विषातील आवड पाहून आरोपींनी त्याला जाळ्यात ओढले. त्याला शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण देण्यात आले आणि ‘रिटेल होम’ नावाचे ॲप डाउनलोड करण्याची सूचना देण्यात आली. त्याच्यासाठी एक आभासी खाते तयार करण्यात आले आणि नंतर त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांनीही गुंतवणूक केली. सुरुवातीला नफा झाल्याचे आमिष दाखवले त्यानंतर त्यांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा, Stock Market Closed For 3 Days: भारतीय शेअर बाजार राहणार तीन दिवस बंद; जाणून घ्या कारण)

खात्यावर कोट्यवधी रुपये पण प्रत्यक्षात भोपळा

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते 1 मार्च दरम्यान, तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुमारे 50 बँक खात्यांमध्ये एकूण 5.14 कोटी रुपये ट्रान्सफर केले. त्यांच्या व्हर्च्युअल खात्याने सूचित केले की त्यांची एकूण गुंतवणूक आणि नफा 87.85 कोटी रुपये आहे. मात्र, तक्रारदाराने आपला निधी काढण्याचा प्रयत्न केला असता, तो ते पैसे काढू शकला नाही. त्यानंतर आरोपींनी कराच्या नावाखाली अतिरिक्त पैशांची मागणी केली, तक्रारदाराला फसवणुकीचा संशय आणि एफआयआर दाखल करण्यास प्रवृत्त केले.

वरिष्ठ निरीक्षक दत्ता चव्हाण, सहाय्यक निरीक्षक नितीन गच्छे आणि अधिकारी संग्राम जाधव, सुयश लोकरे आणि विजय जाधव यांच्यासह डीसीपी दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने तपास सुरू केला, ज्यामुळे रंधवा आणि गुप्ता यांना त्यांच्या संबंधित निवासस्थानातून अटक करण्यात आली. दरम्यान, मुंबईमध्ये या आधीही अशाच प्रकारची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातील काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.