मुंबईतील सीएसएमटी परिसरातील टाईम्स ऑफ इंडिया बिल्डिंगकडे स्टेशंवरून जाणार्या पादचारी (FOB)पूलाचा भाग कोसळल्यानंतर पालिकेकडून आता कामचुकार अधिकार्यांवर बडगा उचलला जात आहे. या प्रकरणामध्ये अटकेत असलेले स्ट्रचरल ऑडिटर (Structural Auditor) नीरजकुमार देसाई (Neeraj Desai) यांना आज जामिन नाकारण्यात आला आहे.
ANI ट्विट
Mumbai foot-over bridge collapse case: Esplanade Court rejects Structural Auditor Neeraj Desai's bail application. #Maharashtra
— ANI (@ANI) April 5, 2019
पोलिसांच्या अहवालानुसार, ऑडिटची जबाबदारी नीरज देसाई यांची कंपनी डीडी देसाई असोसिएट इंजिनियरिंग कन्सल्टंट अॅन्ड अॅनालिस्ट प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांच्याकडून ऑडिट रिपोर्ट देण्यात आला होता. त्यामध्ये पूल सुस्थितीत असल्याचं म्हटलं होतं. पूलाच्या ऑडिटमध्ये बेपरवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांना अटक करण्यात आली आहे.
14 मार्च दिवशी संध्याकाळी सीएसएमटी परिसरातील पूल कोसळला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर 32 लोकं जखमी होते. याप्रकरणामध्ये तीन पालिका अधिकारी अटकेत आहेत.