Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबईतील रहदारी (Crowding planning in Mumbai) आणि गर्दी (Crowd) नेहमीच चिंतेचा विषय ठरली आहे. रेल्वे, बस, रिक्षा, सार्वजनिक ठिकाणे. काही म्हणता काहीच रिकामे नाही. पाहावे तेव्हा खचाखच गर्दी. त्यामुळे या गर्दीचे योग्य व्यवस्थापण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे रहदारीच्या समजल्या जाणाऱ्या जवळपास मुंबईतील 19 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकासासाठी 947 कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली आहे. पुढील 16 महिन्यांच्या आत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.

कोणत्या रेल्वे स्थानकांचा होणार पुनर्विकास?

मध्य रेल्वे: घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, डोंबिवली, नेरळ, शहाड, कसारा, जीटीबीएन, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द.

एकूण-12 स्टेशन

पश्चिम रेल्वे: मुंबई सेंट्रल, सांताक्रुझ, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई आणि नालासोपारा

एकूण-7 स्टेशन (हेही वाचा, Mumbai: मुंबईतील रस्ते कंत्राटदारावर बीएमसी करणार कारवाई)

मुंबईतील गर्दीचे व्यवस्थापण करण्यासाठी मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प 3A चा एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट लिंक - POS अंतर्गत हा एकूण 947 कोटी रुपयांचा पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने तपशील वार आराखडा सादर करण्याचे अवाहन केले होते. हा आराखडा रेल्वे स्थानकासाठी तपशीलवार असावा असेही रेल्वेने म्हटले होते. त्यानुसार आता हा आराखडा सादर झाला आहे.