COVID19: राज्यात कोरोनासह नवा वेरियंट ओमिक्रॉनच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात असून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित जमण्यास मनाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबद्दल अधिक माहिती देताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी असे म्हटले की, फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत एकत्रित जमण्याच्या नियमात सूट दिली जाणार नाही.(Pune COVID19: पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने शिवनेरी जम्बो कोविड सेंटर आणि अवसारी कोविड केअर सेंटर आजपासून सुरु होणार)
तज्ञांचे असे म्हणणे आहे की, निर्बंध लागू केले तरच संसर्गाचा फैलाव कमी होण्यास मदत होईल. त्याचसोबत लसीकरणाचा वेग वाढवावा असे ही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे संसर्ग कमी करणे हे प्राथमिक लक्ष आहे असे टोपे यांनी म्हटले. कॅबिनेटच्या बैठकीत निर्बंध लागू केल्याने लसीकरणाचा वेग मंदावल्याबद्दल चर्चा झाली. त्याचसोबत शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील असा ही निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. आम्ही दररोज आकडेवारीवर नजर ठेवून आहोत आणि त्यानुसारच योग्य निर्णय घेतले जातील.(Coronavirus: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सव्वादोन लाखांच्याही वर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले हे अवाहन)
टोपे यांनी पुढे असे म्हटले की, राज्यात लसीकरणाचा वेग मंदावल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र नागरिकांनी लस घ्यावी यासाठी कठोर पावले उचलली जातील. तर नागरिकांनी स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येणे आवश्यक आहे. राज्यात आतापर्यंत 98 लाख नागरिकांनी कोविड19 वरील लसीचा पहिला डोस घेतल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.