Coronavirus: Mumbai Police | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळात सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशावेळी जनतेला धीर देण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या भूमिका आजवर पार पाडल्या आहेत. अन्न दान करण्यापासून ते मदतीसाठी हेल्पलाईन नंबर सुरु करण्यापर्यंत अनेक कामे ठिकठिकाणी पोलीस दलाकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या पोलिसांकडूनही (Navi Mumbai Police)  नागरिकांसाठी तीन नवे हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये पोलिसांच्या संपर्काचा नियमित 100 नंबर हा सुद्धा समाविष्ट आहे तर त्याशिवाय अन्य दोन नवे क्रमांक सुरु करण्यात आले आहे. गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी हा क्रमांक सुरु करण्यात आला आहे. यासाठी नागरिकांकडूनच मागील काही काळात मागणी करण्यात आली होती त्या मागणीकडे लक्ष देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी सविस्तर जाणून घ्या.  महाराष्ट्रातील Coronavirus संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी, आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर

हे आहेत Helpline numbers

-100

-27574928

-27561099

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात सामान्य आजार आणि त्रास असणाऱ्या नागरिकांची बरीच गैरसोय होत आहे. काही हॉस्पिटल मध्ये कोरोना नसणाऱ्या उपचारासाठी नकार दिला जातोय तर हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी रुग्णवाहिका सुद्धा बऱ्याच ठिकाणी उपलब्ध होत नाहीये. अशावेळी ज्येष्ठ नागरिक तसेच गरोदर महिलांना नियमित तपासणीसाठी जायचे असल्यास त्यांना समस्या येऊ नये यासाठी ते या हेल्पलाइनला संपर्क करू शकतात. ही हेल्पलाईन 24 तास सुरू असते.

अनेक नागरिकांकडे वाहने उपलब्ध नसतात आणि गरज असताना प्रत्येक वेळी रिक्षा, बस, टॅक्सी उपलब्ध होईलच असे नाही अशावेळी पोलिसांनी कमीतकमी दहा रिक्षा या आपत्कालीन स्थितीसाठी तयार ठेवल्या आहेत. जर का नागरिकांकडे त्यावेळी रिक्षांना द्यायला पैसे नसतील तरी त्यांना त्यांच्या घरातून हॉस्पिटल पर्यंत आणि पुन्हा घरी अशी ने आण करण्याची सोय आहे. याबाबत नवी मुंबई पोलीस अधिकारी IPS संजय कुमार यांनी माहिती दिली आहे.

पहा ट्विट

दरम्यान, याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वेळा जेव्हा कोणी डॉक्टर कडे जाण्याबाबत बोलतात तेव्हा त्यांच्याकडे संशयाने पहिले जाते. हॉस्पिटल मध्ये जाण्याच्या भीतीने कोणी गरजूंना मदतही करायला तयार होत नाही, अगदी आपत्तीजनक परिस्थितीमध्ये सुद्धा हे प्रकार घडले आहेत. याबाबत पोलिसांना कंट्रोल रूम मध्ये कॉल करून काहींनी तक्रार केली होती.