कोविड-19 लसीकरण मोहिमे (Covid19 Vaccination Drive) अंतर्गत मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वतीनं आज (शुक्रवार, 17 सप्टेंबर) रोजी कवेळ महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सर्व शासकीय आणि पालिकेच्या कोविड19 लसीकरण केंद्रांवर केवळ महिलांसाठी राखीव सत्र आयोजित करण्यात आलं आहे. आज सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा या कालावधीत लसी दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी पूर्व नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. महिलांना थेट केंद्रावर जावून लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे. या संदर्भातील माहिती पालिकेने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
मुंबई मधील सर्व 227 प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि सर्व शासकीय, पालिका रुग्णालयं, लसीकरण केंद्र येथे थेट येऊन महिलांना कोविड लस घेता येणार आहे. या विशेष सत्रामुळे आजसाठीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंद ठेवण्यात आले आहे.
BMC Tweet:
१७ सप्टेंबर, २०२१ रोजी मुंबईतील शासकीय व महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये केवळ महिलांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यात येईल.
ह्या केंद्रांवर सकाळी १०:३० - संध्याकाळी ६:३० या वेळेत महिला थेट जाऊन लस घेऊ शकतात. ऑनलाईन नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.#MyBMCVaccinationUpdate
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 16, 2021
कोविड-19 लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठीच या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. (COVID19 Vaccination संदर्भात वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तज्ञांनी दिलेली उत्तरे तुम्हाला येथे मिळतील फक्त एका क्लिकवर)
दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबई मधील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. काल मुंबईत 446 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 421 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.