कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) मंदावत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेचा (Covid-19 Third Wave) धोका अद्याप कायम आहे. सष्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता टाक्स फोर्सने वर्तवली आहे, अशी माहिती अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. बारामती मधील कोरोना आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. (Covid-19 Third Wave: देशात ऑगस्ट महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट; ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या शिगेला- Reports)
बारामती मधील कोरोना आढावा बैठकीत कोरोनाची संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लसीकरण, बालकांसाठी वैद्यकीय सुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर आणि ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करुन देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
अजित पवार ट्विट्स:
बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसंच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत आयोजित कोरोना आढावा बैठकीत माहिती जाणून घेतली. pic.twitter.com/JjyelEiP2o
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 14, 2021
सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करावी.कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकानं खबरदारी घेणं गरजेचं आहे.काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत तरी नागरिकांनी मास्क वापरावा,सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असं आवाहन आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 14, 2021
टाक्स फोर्सनं सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यादृष्टीनं सर्व नियोजन सुरु आहे. उपलब्ध ऑक्सिजनची आवश्यकता वाढण्याची शक्यता गृहित धरून ऑक्सिजनचा साठा ठेवणं आवश्यक आहे. ज्यांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच मॉलमध्ये प्रवेश देणं बंधनकारक करा.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 14, 2021
तसंच पहिला डोस घेतलेल्यांना प्रथम प्राधान्य द्या, लसीकरणाचं नियोजन करा, सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या. नागरिकांनी मास्क वापरावा,सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.