Crawford Market (Photo Credit: ANI)

लॉकडाऊन हे कोणालाच नको आहे, परंतु तरीही विविध भागात किंवा गर्दीच्या ठिकाणी अनेकजण विनामास्क फिरताना दिसत आहेत. लोकांच्या या निष्काळजी वृत्तीमुळे आता मुंबई पोलिसांनाही (Mumbai Police) विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर दंड आकरण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यातच विनामास्क फिरणाऱ्याविरोधात मुंबई पोलिस सर्तक झाले आहेत. यातच मुंबईतील (Mumbai) क्रॉफर्ड मार्केटमध्ये (Crawford Market) विनामास्क फिरताना आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून पोलिसांनी 200 रुपये दंड वसूल केला आहे. तसेच दंड आकरल्यानंतर संबंधित व्यक्तीला तोंडाला लावण्यासाठी मास्क दिला आहे.

महाराष्ट्रात अटोक्यात येत असलेला कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढू लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येऊ नये म्हणून प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. तर, काही शहरात कडक निर्बंधदेखील लागून करण्यात आली आहे. हे देखील वाचा- नागपूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नियमावली कडक; शाळा, कॉलेज ते लग्नाचे हॉल बंद करण्याबाबत नितीन राऊत यांनी दिले हे आदेश

एएनआयचे ट्वीट-

मुंबईत सातत्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. मुंबईत आज आणखी 760 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 19 हजार 888 वर पोहचली आहे. यापैकी 3 लाख 180 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 11 हजार 446 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 7 हजार 397 रुग्ण सक्रीय आहेत.