COVID-19 Patient Missing in Pune: पुण्यातील जंबो कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेली 33 वर्षीय महिला रुग्ण 29 ऑगस्टपासून बेपत्ता; नातेवाईकांकडून प्रशासनाविरोधात आंदोलन
COVID-19 patient goes 'missing' from Pune hospital (Photo Credit: ANI)

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले असताना पुण्यातील (Pune) जम्बो कोविड सेंटरमधून (COVID-19 Jumbo Hospital, हादरून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचारासाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल झालेली 33 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. परंतु, संबंधित रुग्ण या रुग्णालयात दाखल झालाच नाही, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांना सांगितले आहे. त्यानंतर बेपत्ता असलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. तसेच जम्बो कोविड सेंटरसमोर आंदोलन करत प्रशासनाविरोधात आंदोलन केले आहे.

प्रिया गायकवाड असे जम्बो रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रिया यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते. ससून रूग्णालयातून याठिकाणी दाखल झालेल्या या रूग्ण महिलेवर उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आले. मात्र, बरी झालेल्या प्रिया गायकवाड यांना जम्बो कोविड सेंटरमधून घरी घेऊन जाण्यासाठी गेलेल्या आईला 'तुमची मुलगी येथे अॅडमिटच नव्हती', अशी धक्कादायक माहिती देण्यात आली. यामुळे जम्बो कोविंड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या प्रिया यांच्या आईसह नातेवाईकांनी उपोषणचा मार्ग निवडला आहे. हे देखील वाचा- Coronavirus In Mahrashtra: महाराष्ट्रातील मुंंबई, पुणे सहित सर्व जिल्हे व शहरांंची कोरोनाबाधितांंची आकडेवारी पाहा

एएनआयचे ट्विट-

माझी मुलगी 29 ऑगस्टपासून जम्बो कोविड सेंटरमधून बेपत्ता आहे. रुग्णालयातील अधिकारी सांगतात की तिला कधीही रुग्णालयात दाखल केले नाही. मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती बेबत्ता मुलीच्या आईने दिली आहे. तसेच प्रिया गायकवाड यांचा घातपात झाल्याचा संशय तिच्या नातेवाईकांकडून वर्तवण्यात येत आहे.