सध्या जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) दहशत माजवली आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 450 हून अधिक झाली आहे. तसेच महाराष्ट्रागत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 107 वर पोहचली आहे. राज्यात आज 6 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यातील पाच रुग्ण हे मुंबईमधील असून एक रुग्ण अहमदनगरचा आहे. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 101 होती. परंतु, दुपारपर्यंत यात आणखी 6 रुग्णांची भर पडली आहे. याशिवाय देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 450 हून अधिक झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. (हेही वाचा - सावधान! विनाकारण घराबाहेर पडणे पडेल महागात; मुंबई येथे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 112 गुन्हे दाखल)
COVID-19: Maharashtra tally 107; six more test coronavirus positive
— Press Trust of India (@PTI_News) March 24, 2020
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत. देशात 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तसेच काही राज्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाच्या भीतीने मुंबई-पुण्यातील नागरिक गावाकडे धाव घेत आहेत. अशा नागरिकांकडे संशयातून पाहू नका, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.