
ठाण्याच्या कळवा मध्ये कोविड 19 बाधित 21 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. हा तरूण मधुमेही होता. “Comorbidities” मधून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे मनपा ने माहिती दिली आहे. गुरूवार, 22 मे दिवशी हा तरूण मधुमेहाशी निगडीत समस्येचा त्रास होत असल्याने हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्याचं सांगण्यात आलं आहे पण तो नंतर करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाचा मृत्यू त्याच्या मूळ आजाराशी संबंधित आहे. रुग्णालयात सध्या 19 बेड्सचा COVID-19 वॉर्ड आहे ज्यामध्ये आरटी-पीसीआर चाचणी सुविधा आहेत. नक्की वाचा: Mumbai Healthcare Facilities: मुंबईत मधुमेह सर्वात प्राणघातक आजार, सार्वजनिक दवाखान्यांची कमतरता; Praja Foundation ने प्रसिद्ध केला शहरातील आरोग्य समस्यांवर प्रकाश टाकणारा धक्कादायक अहवाल .
TMC ने त्यांच्या ताज्या अपडेटमध्ये शहरात 8 नवीन COVID-19 रुग्णांची नोंद केली आहे, ज्यामुळे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 18 झाली आहे. यापैकी फक्त एक रुग्ण रुग्णालयात दाखल आहे तर उर्वरित रुग्ण घरीच home isolation मध्ये आहेत, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम .
Rishikesh AIIMS Director Meenu Singh यांनी ANI सोबत बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये नमूद केले की कोविडचा हा प्रकार फारसा हानिकारक नाही, परंतु लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. सध्या देशात कोरोना रूग्ण वाढत असले तरीही तज्ज्ञांच्या मते, परिस्थिती नियंत्रणात आहे.
शनिवारी महाराष्ट्रात47 नवीन COVID-19 रुग्णांची नोंद झाली, ज्यामध्ये मुंबईत सर्वाधिक संसर्ग झाल्याचे आढळले. राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत 30, पुण्यात सात, ठाण्यात सहा, नवी मुंबईत तीन आणि नागपूरमध्ये एक रुग्ण आढळला आहे.
नागरिकांना सजग राहण्याचा सल्ला
कोविड 19 चे रूग्ण वाढत असले तरीही नागरिकांना घाबरू नका, परंतु कोविड प्रोटोकॉल पाळा आणि लक्षणे दिसल्यास वैद्यकीय मदत घेणे यासारख्या मूलभूत खबरदारीचे पालन करत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असलेल्यांसाठी विशेष काळजी घेण्याची शिफारस केली जात आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णांची संख्या वाढत असताना, राज्य वाढीव देखरेख आणि लवकर हस्तक्षेप करून परिस्थिती व्यवस्थापित करण्यास तयार असल्याची ग्वाही दिली आहे.