महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाबाधीतांच्या (Coronavirus patients) संख्येत झपाट्याने वाढ होत असताना कल्याण येथून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कल्याण येथे आढळून आलेल्या पहिल्या कोरोनाबाधीतांना मुंबई येथील जसलोक रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात पती-पत्नीसह त्यांच्या 3 वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. या तिघांनाही कोरोनाची लागण झाली होती. मार्च महिन्याच्या 17 तारिखेला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु होते. संबंधित व्यक्ती गेल्या काही दिवासांपूर्वी अमेरिकेतून भारतात आला होता. परंतु, अचानक त्याला सर्दी खोकला आणि घश्याचा त्रास जाणवू लागल्याने त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार दरम्यान त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्याने त्याला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून त्याची पत्नी आणि 3 वर्षाच्या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण भारतात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, यातच कल्याण येथील पहिल्या कोरोनाबाधीत रुग्णांची कोरोनाच्या जाळ्यातून सुटका झाली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती अमेरिकेतून भारतात परतली होती. परंतु, परदेशातून घरी परतल्यानंतर या व्यक्तीला अचानक सर्दी, खोकला आणि घश्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान या व्यक्तीची प्रकृती खालावली होती. यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच काही दिवसांनी त्याला आयसीयूमध्येही दाखल करण्यात आले होते. परंतु, काही दिवसानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. त्यानंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयातून जसलोक रुग्णालयात दाखल केले होते. आता ते सर्वजण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हे देखील वाचा- 'अफवा नको जागरूकता पसरवा' मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन
कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असतानाही रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल झाला नाही. यातच महाराष्ट्रात आणखी 3 नवे रुग्ण आढळल्याचे समजत आहे. दरम्यान, बुलढाण्यात एक तर, पुणे येथे 2 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.