Cyclone Nisarga: बीकेसी येथील 'जंबो फॅसिलिटी'चे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाल्याची माहिती खोटी- मुंबई महापालिका
Jumbo Facility Set Up At BKC | (Photo Credits: Twitter )

मुंबई (Mumbai) येथील बिकेसी (BKC) परिसरात उभारलेल्या 'जंबो फॅसिलिटी' ला निसर्ग चक्रीवादल (Cyclone Nisarga) संकटामुळे मोठ्या प्रमाणात हानी पोहचल्याच्या माहितीचे मुंबई महापालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) खंडण केले आहे. 'जंबो फॅसिलिटी' कुंपणाला किरकोळ नुकसान पोहोचले असून, इमारत पूर्णपणे उत्तम स्थितीत आहे. आज सायंकाळपासून इथले काम पुन्हा सुरळीत सुरु होईल, असही विश्वासही मुंबई महापालिका (BMC) अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कोरना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी आणि कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबई येथील बीकेसी परिसरात 'जंबो फॅसिलिटी' उभारण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे या 'जंबो फॅसिलिटी'चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. काही राजकीय नेत्यांनीही काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. (हेही वाचा, Mumbai Rains: मुंबई सह उपनगरांमध्ये पावसाची दमदार हजेरी; सायन परिसरातील सखल भागात पाणी साचले (See Pics))

ट्विट

भाजप आमदार राम कदम यांनीही बीकेसी येथील कोरोना क्वारंटाईन हॉस्पीटलचे व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला होता.

ट्विट

Mumbai Rain: मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची जोरदार हजेरी; काही भागात पाणी साचले, पाहा फोटो - Watch Video

मुंबई महापालिकेने चुकीच्या माहितीचे खंडण करताना म्हटले आहे की, बिकेसी येथील 'जंबो फॅसिलिटी' ला Cyclone Nisarga मुळे मोठ्या प्रमाणात हानी पोहचल्याची माहिती खोटी आहे. येथील कुंपणाला किरकोळ नुकसान झाले असून रुग्णालयाची इमारत उत्तम स्थितीत आहे. आज संध्याकाळ पासून येथील कार्य सुरळीतपणे सुरू केले जाईल.