Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. पुणे (10), मुंबई (04) , ठाणे (1), अहमदनगर (01), नागपूर (4), पाठोपाठ आता यवतमाळ (Yavatmal) येथेही 2 व्यक्तींना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 26 इतकी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 11 जणांचा एक समूह दुबईला गेला होता. तिथून परतून भारतात आल्यानंतर यातील 2 जणांना COVID 19 ची लागण झाल्याचे चाचणी नंतर आढळून आले.

यवतमाळ जिल्ह्यातून दुबईला गेलेल्या 11 जणांच्या समूहामध्ये 3 कुटुंबांचा समावेश होता. त्यात सहा पुरुष आणि 4 महिलांचा समावेश होता. हा समूह 24 फेब्रुवारी या दिवशी दुबईला गेला होता. तेथून तो 1 मार्च या दिवशी भारतात परतला. या सर्वांची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी झाली. त्यानंतर हा ग्रुप यवतमाळला आला. त्यातला एक विद्यार्थी पुण्याला गेला. दरम्यान, दुबईहून परतलेल्या दोन व्यक्तींना कोरना झाल्याचे पुढे आले. त्यामुळे या व्यक्तिंच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे 11 जणांच्या या समूहाने कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या त्या रुग्णांच्या विमानातूनच प्रवास केलेल्याचे पुढे आले.

एएनआय ट्विट

दरम्यान, यवतमाळ येथील समूहातील सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यातील दोघांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या दोघांवर उपचार सुरु आहेत. तर उर्वरीत 9 जणांना सरकारी रुग्णालयात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या 9 जणांच्या थुंकीचे नमुने नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यातील 4 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उर्वरीत 5 जणांचा अहवाल काय येतो याबाबत सर्वजण डोळे लाऊन बसले होते. त्यातील 2 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (हेही वाचा, Coronavirus: मुंबई महापालिका सतर्क, कोरोना व्हायरस बाबत खोटी माहिती, अफवा पसरवणाऱ्यांवर करणार कडक कारवाईचे)

एएनआय ट्विट

कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. विविध माध्यमांतून लोगजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना घाबरुन न जाता काळजी घेण्याचे अवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना सातत्याने हात धुणे, स्वच्छ कपडे वापरणे, कोरोना व्हायर बाधित व्यक्तीच्या संपर्कात न जाणे यांसारखी कळजी घेण्यास सांगण्यात येत आहे.