Coronavirus: मुंबई महापालिका सतर्क, कोरोना व्हायरस बाबत खोटी माहिती, अफवा पसरवणाऱ्यांवर करणार कडक कारवाईचे संकेत
Fake message on circulated in social media, later clarified by BMC. (Photo Credit: Twitter)

मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) कोरोना व्हायरस (Coronavirus) बाबत चुकीची माहिती, संदेश, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. विदेशातून आलेले नागरिक, त्यांची तपासणी आणि कोरोना व्हायरस (COVID 19) याबाबत सोशल मीडियावरुन अनेक लोक आधार नसलेली माहिती पसरवत आहेत. यात मॉर्फ केलेले काही फोटग्राफ्स आणि ग्राफीक्सचाही समावेश आहे. या बाबींकडे मुंबई महापालिकेने गांभीर्याने पाहात कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. अधिकृत ट्विटर हँडलवर एक ट्विट करुन मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. पालेकेने आपल्या ट्विटमध्ये उदाहरणादाखल एक व्हायरल ग्राफीक्सही शेअर केले आहे. त्यासोबत संदेश लिहिला आहे की, मुळ समस्येपेक्षा अशा अफवांचेच अधिक संकट आहे. अशा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर कडक करावाई करण्यात येईल.

मुंबई महापालिकेने केलेल्या ट्विटमध्ये शेअर करण्यात आलेल्या एका ग्राफीक्समध्ये एक व्यक्ती दुबईहून आल्याचा दावा करण्यात आला आहे. ही व्यक्ती आणी त्याच्या सोसायटीतील सर्व सदस्यांची मुंबई महापालिकेचे कर्मचारी चाचणी करत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या ग्राफीक्समध्ये एका व्यक्तीचे छायाचित्रही वापरण्यात आले आहे. वास्तवात ग्राफीक्समध्ये करण्यात आलेल्या दाव्यात काहीच तथ्य नाही. याच गोष्टीकडे लक्ष वेधत पालिकेने अशा प्रकारचे संदेश पसरवून अफवांचे पीक आणणाऱ्यांविरोधात कड कारवाईचे संकेत दिले आहेत. (हेही वाचा, Coronavirus: ऑर्डर.. ऑर्डर..! मुंबई उच्च न्यायालय कामकाज बंद! औरंगाबाद, नागपूर खंडपीठालाही आदेश लागू, फक्त अतिमहत्त्वाच्या सुनावणी होणार)

मुंबई महापालिका ट्विट

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा स्वच्छ धुण्याचे अवाहन केले जात आहे. हा धुताना साबन अथवा सॅनिटायजर वापरण्याचे अवाहन केले जात आहे. हीच बाब ओळकून काही समाजकंटकांनी भेसळयुक्त सॅनेटायझर निर्मिती केली आहे. पुणे येथे हा प्रकार उघडकीस आला असून, प्रशासनाने या प्रकरणीक तिघांना अटकही केली आहे. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहण्याची आणि काही अनुचीत प्रकार निदर्शनास आल्यास प्रशासनाला संपर्क करण्याची आवश्यकता आहे.