Coronavirus | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आटोक्यात येईपर्यंत मुंबई उच्च न्यायालय (Mumbai High Court) तसेच, औरंगाबाद (Aurangabad Bench), नागपूर (Nagpur Bench) आणि गोवा खंडपीठाचे कामकाज बंद राहणार आहे. केवळ अतिमहत्त्वाच्या सुनावणी करण्यासाठीच न्यायालयाचे कामकाज सुरु केले जाणार आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. हे आदेश औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठांनाही लागू होणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील बालमोहन विद्यामंदीर या शाळेनेही सुट्टी घोषीत करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात सर्व प्रकारचे शासकीय, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम टाळण्यात यावे. त्याचे आयोजन करु नये असे अवाहन राज्य सरकारच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते. या अवाहनाला प्रामुख्याने राजकीय पक्षांकडूनही प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला गुडीपाडवा मेळावाही रद्द केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. (हेही वाचा, Coronavirus: माहाराष्ट्र नवनिर्माण सेना गुढीपाडवा मेळावा रद्द)

दरम्यान, कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर माहिती देताना आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पुणे विभागीय आयुक्तांनी सांगितले की, काही शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी मीळाली असली तरी, ही सुट्टी सहल अथवा इतर कामांसाठी नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मुलांना सहल, अथवा इतर ठिकाणी भटकू देऊन नये. उद्यानामध्ये खेळतानाही दोन मुलांमध्ये सुरक्षीत अंतर राहील याची काळजी पालकांनी घेणे आवश्यक आहे.