Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Updates In Mumbai: मुंबई महापालिकेच्या (BMC) वतीने आज, 23 मे रोजी रात्री 10 वाजेपर्यंतचे कोरोना व्हायरसचे अपडेट्स देण्यात आले आहेत. यानुसार महापालिका क्षेत्रात मागील 24 तासात कोरोनाचे 1566 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय, 40 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 396 जणांनी कोरोनावर मात करून डिस्चार्ज सुद्धा मिळवला आहे. या एकूण आकडेवारीनुसार आज मुंबई शहरातील कोरोनाचा एकूण रुग्णांचा आकडा 28,634 वर पोहचला आहे. आतापर्यंत एकूण 7476 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर 949 जणांनी कोरोनामुळे आजवर प्राण गमावले आहेत. सद्य घडीला मुंबईतील विविध रुग्णालयात 24 हजार 323 जणांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत सर्वाधिक रुग्ण हे धारावी (Dharavi) या भागात आढळले असल्याने हा भाग मुंबापुरीतील कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे. मुंबई सहित महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची एकूण जिल्हानिहाय आकडेवारी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 47910 वर पोहचला असून त्यापैकी 1577 जणांचा बळी गेला आहे. तसेच 13404 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आज महाराष्ट्रात कोरोनाचे नवे 2608 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 60 जणांचा बळी गेला असून 821 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. (हे ही वाचा- महाराष्ट्र सरकारने आज जाहीर केलेल्या माहितीन्वये कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव हा 40 वयातून कमी वयाच्या व्यक्तींवर दिसून येत असल्याचे समजतेय)

ANI ट्विट

दरम्यान, आजच्या दिवसभरात संपूर्ण देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1,25,101 वर पोहचला असून आजपर्यंत 3720 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सद्य स्थितीत देशात 69,597 रुग्णांवर उपचार सुरु असून 51,784 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.