Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रातील 50% कोरोना रुग्ण हे 40 हुन कमी वयाचे असल्याची ठाकरे सरकारची माहिती, पहा आकडेवारी
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची (Coronavirus In Maharshatra)  आकडेवारी पाहता, राज्यात कोरोनाबाधित 50 टक्के रुग्ण हे 40 वयवर्षाहून कमी वयाचे असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या नियमित अपडेट्समधून ही आकडेवारी समोर आली आहे. ज्यानुसार 22 मे शुक्रवार रात्री 10 वाजेपर्यंत राज्यात तब्बल 20,820 कोरोना रुग्ण हे 40 वयाहुन कमी वयाचे असल्याचे समजत आहे. तर दुसरीकडे ज्या वयोगटाला कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे आतापर्यंत मानण्यात येत होते अशा 60 हुन अधिक वयाच्या व्यक्तींमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडण्याची टक्केवारी आवडघी 14 टक्के इतकीच आहे. Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स

 प्राप्त माहितीनुसार, कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत महाराष्ट्रात 31 ते 40 वयोगटातील 8,394 जणांचा समावेश आहे जे एकूण संख्येच्या 21.44 टक्के आहे. तर 21 ते 30 वयोगटातील 8,252 म्हणजेच 21.08 टक्के रुग्ण आहेत. यापाठोपाठ 11 ते 20 या वयोगटातील कोरोना रुग्णांची संख्या ही 2,771 तर 10 वर्षाहून कमी वयाच्या रुग्णांची संख्या 1,413 इतकी आहे. Coronavirus: भारतात 6654 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,25,101 वर

पहा कोरोना रुग्णांची वयानुसार आकडेवारी

क्र. वय वर्ष  कोरोनाची रुग्णसंंख्या टक्केवारी
1 0-10 1413 3.61
2 11-20 वर्ष 2761 7.05
3 21-30 वर्ष 8252 21.08
4 31-40 वर्ष 8394 21.44
5 41-50 वर्ष 6952 17.76
6 51-60 वर्ष 6184 15.80
7 61-70 वर्ष 3416 8.73
8 71-80 वर्ष 1378 3.52
9 81-90 वर्ष 343 0.88
10 91-100 वर्ष 50 0.13
11 101-110 वर्ष 1 0.00
एकुण 39144 100.00

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 44,582 रुग्ण आढळले असून आतापर्यंत एकूण 12 हजार 583 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 30,474 रुग्ण उपचार घेत आहेत तर आजवर 1517 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाच्या रुग्णांचे सर्वाधिक आकडे हे मुंबई आणि पुण्यातून समोर येत आहेत, मुंबईत सध्या कोरोनाचे 27,068 रुग्ण आहेत.