देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यान त्याच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. याच कारणास्तव सरकारने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवसांसाठी वाढवले आहेत. कोरोनाच्या लढाईत विविध स्तरातून मदत केली जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स उपचार करत आहेत. तर रस्त्यावर पोलीस कर्मचारी ही सुद्धा गस्त घालून नागरिकांना कोरोनाच्या परिस्थितीत घरीच थांबण्याचे आवाहन करत आहेत. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात आतापर्यंत 23 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली आहे.
सद्यच्या घडीला आपण कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात पोहचलो आहोत. त्यानुसार आता महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजाराच्या पार गेला आहे. आज राज्यात नवे 286 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहत. तसेच 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 जण पुणे आणि 3 जण मुंबईतील असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचसोबत 300 रुग्णांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र 23 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.(Maharashtra CM COVID19 Relief Fund: कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 245 कोटी रुपयांचे योगदान; जाणून घ्या कुठे करू शकाल मदत)
Till now, 23 police personnel in Maharashtra have tested positive for Coronavirus.
— ANI (@ANI) April 16, 2020
दरम्यान, भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 12759 वर पोहचला आहे. त्यामध्ये 420 जणांचा मृत्यू आता पर्यंत कोरोनामुळे झाला आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाची एकूणच परिस्थिती पाहता सरकार विविध नियमांचे अंमलबजावणी करत असल्याचे दिसून येत आहे. तर पीपीई किट आणि मास्क उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.