सध्या संपूर्ण देशावर आलेल्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संकटाचा सामना केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांच्या हातात हात घालून करत आहेत. याबाबत अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत, आरोग्य विभाग, पोलीस विभाग मदतीसाठी सज्ज आहे. मात्र या गोष्टींसाठी बराच पैसाही खर्च होत आहे. अशात महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला (Maharashtra CM COVID19 Relief Fund) मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत महाराष्ट्र मुख्यमंत्री कोरोना व्हायरस मदत निधीस 245 कोटी रुपयांचे योगदान प्राप्त झाले आहे.
Till now, Maharashtra CM COVID19 Relief Fund has received contributions of Rs 245 Crores: Maharashtra Chief Minister's Office
— ANI (@ANI) April 16, 2020
कोरोना विषाणू संकटाला सामोरे जाण्यासाठी, राज्य सरकार घेत असलेल्या उपायांवर राज्यातील बरीच रक्कम खर्च केली जात आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी समाजसेवी संस्था, उद्योग, धार्मिक संस्था आणि इतर लोक देखील मदत करत आहेत. अगदी हातावरचे पोट असणारे लोकही त्यांना जमेल तितकी मदत करत आहेत. याचे फळ म्हणजे आतापर्यंत मुख्यमंत्री निधीमध्ये कोरोना व्हायरससाठी 245 कोटी जमा झाले आहेत. आरोग्य सेवा, पोलीस यंत्रणा, चाचण्या, किट्स अशा अनेक गोष्टींवर ही रक्कम खर्च केली जात आहे.
कोरोना व्हायरसशी चार हात करण्यासाठी महाराष्ट्र सरकार इतर राज्यांपेक्षा चांगले काम करत आहे. त्यासाठी मदत म्हणूनही अनेक लोकही पुढे आले आहेत. या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) या नावाने स्वतंत्र बँक खाते उघडले गेले आहे. (हेही वाचा: Coronavirus: मुंबईत आज कोरोनाचे नवे 107 रुग्ण आढळून आल्याने शहरातील एकूण आकडा 2043 वर पोहचला)
Maharashtra CM Fund माहिती -
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Saving Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300
दरम्यान देशातील कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीविषयी बोलायचे तर, देशात 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 941 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, यासह आता देशात संसर्ग झालेल्यांची संख्या 12,759 वर गेली आहे. तर मुंबईत आज कोरोनाचे नवे 107 रुग्ण तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 2043 वर पोहचला आहे.