Coronavirus: कोरोना व्हायरस संकट, लॉकडाऊन काळात उद्योग विश्वाने कामगारांची काळजी घ्यावी- शरद पवार
Sharad Pawar | ( Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना धिराने करणे आवश्यक आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सूचनांचे पालऩ करणे, तसेच संकट काळात शासरनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. तसेच, उद्योग जगताने कामगार वर्गाची काळजी घेणे गरजेचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाध साधला या वेळी पवार बोलत होते. या वेळी शरद पवार यांनी आरोग्य, उद्योग, व्यवसाय, शेती, सुरक्षा आणि यासोबतच इतरही विविध विषयांवर भाष्य केले.

कोरोना संकटाच्या काळात कोणताही पक्ष राजकारण आणत नाही ही जमेची बाब आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जसे कोरोना व्हायरस काळात काम करत आहेत तशाच पद्धतीने इतर पक्षांतील घटकही काम करत आहेत. त्यामुळे कुणीही राजकारण करत नाही हे महत्त्वाचे. अन्नधान्य पुरवठा आणि वैद्यकीय सेवा आदिची काळजी घेतली जात आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही पवार या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Lockdown Guidelines: रस्त्यावर थुंकाल तर खबरदार! लॉकडाऊन कालावधीत केंद्रीय गृह मंत्रालयाची मार्गदर्शक तत्व जारी)

राजकारण बाजूला ठेऊन केवळ कोरोना व्हायरस संकट निवारण हा एककलमी कार्यक्रम आहे. केंद्र आणि राज्य दोन्ही या संकटात एकत्र काम  करत  आहेत. दरम्यान, देशातील आणि राज्यातील जनतेसमोर आर्थिक संकट मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील बँकांना त्यासंदर्भात आदेश देण्यात यावे, असेही पावर म्हणाले. कोरोना संकटामुळे लॉकडाऊन बाबतचा निर्णय घ्यावा लागला त्यामुळे शेतकऱ्याला आपला शेतकमाल टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. त्याबाबतही सरकारने विचार करायला हवे असेही शरद पवार म्हणाले.

फेसबुक लाईव्ह व्हिडिओ इथे पाहा

दरम्यान, अमेरिका, इटली आदी देशांमध्ये कोरोना व्हायरस संकटामुळे निर्माण झालेली स्थिती अत्यंत भयावह आहे. ती परिस्थिती विचारात घेऊन लॉकडाऊन हा 3 मे पर्यंत वाढवला हे चांगले झाले. पंतप्रधानांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. आपण संयमाने आणि धीराने या संकटावर मात करु असेही पवार म्हणाले. राज्य सरकारने भविष्यातील संकट विचारात घेऊन पावले टाकणे आवश्यक आहे. यामध्ये पाणीटंचाई, बेरोजगारी, शेती, शेतमाल, शेतकरी आदी गोष्टींकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचेही शरद पवार म्हणाले.