Lockdown | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

केंद्रीय गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs) द्वारा कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) बाबत नवी Guidelines जारी केली आहे. त्यानुसार देशातील कोणत्याही नागरिकाला घराबाहेर पडताना तोंडाला मास्क, अथवा रुमाल बांधणे बंधनकारक आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दंडनीय अपराध असेन. कोरोना व्हायरस संक्रम संसर्ग आणि प्रसार थांबविण्यासाठी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात येत असल्याचे या आधिच सांगितले आहे. त्यानुसार 14 एप्रिल रोजी संपणारा लॉकडाऊन आता 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

लॉकडाऊन पार्ट टू बाबत देण्यात आलेल्या गाईडलाईन्समध्ये शेतीविषयक सर्व कामं, वाहतूक आणि यंत्रणा आदींना सूट देण्यात आली आहे. तर राज्या-राज्यांतर्गत सुरु असलेली बससेवा, राज्यांतर्गत, जिल्ह्यांतर्गत सुरु असलेली वाहतूक, बससेवा ही पूर्णपणे बंद असणार आहे. याशिवाय सर्व रेल्वे, लोकल, मेट्रो आणि विमानसेवाही बंद असणार आहे. (हेही वाचा, भारतात 1076 नवीन कोरोना बाधितांसह देशात COVID-19 रुग्णांची एकूण संख्या 11,439- आरोग्य मंत्रालय)

लॉकडाऊन काळातील गृह मंत्रालय द्वारा जारी गाईडलाईन्स

  • औद्योगिक उपक्रमांवरील बंदी कायम राहिल.
  • सर्व प्रकारची वाहतूक सेवा (बस, रेल्वे, मेट्रो, विमान) बंद राहतील.
  • आत्यावश्यक सेवा, कारणं यासाठी घराबाहेर पडण्यास, वाहतुकीस मान्यता.
  • राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक बंद.
  • कृषीविषयक सर्व यंत्रणा, वाहतूक सुरु.
  • 20 एप्रिलपासून निवडक ठिकाणी व्यवहार करण्यास मान्यता.
  • सर्वाजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी.

एएनआय ट्विट

दरम्यान, देशात गेल्या 24 तासात देशभरात एकूण 1076 नवे कोरोना रुग्ण सापडेल आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांसह देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या आता 11,439 वर पोहोचली आहे. यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या 9756 रुग्णांसह 1306 डिस्चार्ज मिळालेल्या आणि 377 मृत्यू झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे.