Kopari (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाउनचे आदेश येत्या 30 एप्रिल पर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जाहीर केला. तसेच राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये महाराष्ट्राची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार आता ठाणे मधील कोपरी हे ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. कारण ग्रीन झोन (Green Zone) नुसार या परिसरात एकही कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळून आला नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती ठाणे महापालिकेने त्यांच्या ट्वीटर अंकाउंटवरुन दिली आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनाचे आज 134 नवे रुग्ण आढळून आल्याने आकडा 1895 वर पोहचला आहे.

कोपरीमध्ये एकही कोरोना बाधित रूग्ण न सापडल्याने तो ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच कोपरी येथे बाहेरील व्यक्ती आत प्रवेश करु नये म्हणून गावतील सर्व प्रवेश रस्ते सील करण्यात आल्याचा निर्णय आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 91 टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे येथील असून उर्वरित 9 टक्के रुग्ण हे राज्याच्या इतर भागातील आहेत. कोरोनाबाधीत रुग्णांपैकी 70 टक्के रुग्णांना लक्षणे नसून 25 टक्के रुग्णांना सौम्य स्वरूपाची तर 5 टक्के रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.(Corona In Maharahstra: कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार Red, Orange, Green झोन मध्ये महाराष्ट्र राज्याची विभागणी; तुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये येतो जाणून घ्या)

दरम्यान, भारतात नवे 918 रुग्ण आढळून आले आहेत. तर 31 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 8447 वर पोहचला आहे. त्यापैकी 7409 हे अॅक्टिव रुग्ण, 765 रुग्णांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 273 वर पोहचल्याची माहिती देण्यात आली आहे