प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी स्थानिक सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करत कोरोना बाबत अधिक माहिती दिली आहे. तसेच कोरोना व्हायरससंबंधित घेण्यात आलेले निर्णय शुक्रवारी मध्यरात्री पासून लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार सिनेमागृह, स्विमिंग पूल, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यानंतर शनिवारपासून बहुतांश ठिकाणी त्यांच्या या नियमाचे पालन करण्यात आले. मात्र मुंबईत सिनेमागृह बंद ठेवण्याबबात लेखी आदेश आला तरच ते बंद ठेवू अशा प्रश्न मालकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

शनिवारी दादर मधील प्लाझा सिनेमा, जुहू येथील पीव्हीआर सिनेमागृह सुरु ठेवण्यात आले होते. यावर शिवसैनिकांनी आक्षेप घेतला आहे. माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांना जुहू मधील पीव्हीआर सिनेमागृह सुरु असल्याची माहिती मिळाली. यावर आंबेरकर यांनी सिनेमागृहाच्या विरोधात धाव घेत तक्रार दाखल करु असा इशारा दिला आहे. मात्र सिनेमागृहाच्या मालकाने लेखी आदेश आले तर बंद ठेवणार असल्याचे म्हटले आहे.(Coronavirus: पुणे, पिंपरी येथील शाळा बंद राहणार)

तर महाराष्ट्रात आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांना विलगीकरण कक्षात रुग्णांना ठेवण्यात आले आहेत. दुबई, फ्रान्स आणि अमेरिकेतून आलेले रुग्ण होते. रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत.रेल्वे आणि बस सेवा बंद करणे अशक्य असून जनतेने अनावश्यक प्रवास टाळावे. कोणत्याही कार्यक्रमांना सरकारकडून परवानगी देण्यात येणार नाही. राज्यातील खासगी क्षेत्रातील मालकांनी कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होमची सुविधा द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचसोबत 10 वी आणि 12 वीच्या परिक्षा सुरु राहणार आहेत. तर पहिल्या ते नववी पर्यंतच्या परिक्षांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे