देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे थैमान दिवसागणिक वाढत चालले आहे. तर सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करत आहेत. तसेच पुढील काही दिवस लॉकडाउनच कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला होता. दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स दिवसरात्र कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजारांच्या पार गेला आहे. मात्र तरीही कोरोनावरील उपचार घेतल्यानंतर बरे सुद्धा झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. याच पार्श्वभुमीवर पुण्यातील एका 92 वर्षीय आजींनी कोरोनावर मात केली आहे. तसेच परिवारातील 4 जणांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसचा प्रथम रुग्ण पुण्यातच आढळून आला होता. त्यानंतर कोरोनाबाधितांचा आकडा राज्यभरात वाढत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सरकारने तातडीने कोरोना संबंधित नियोजनपूर्वक काळजी घेण्यास सुरुवात केली. तर ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. तसेच नागरिकांनी कोरोना व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये असे आवाहन सुद्धा केले. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी आणि त्याला हरवण्यासाठी आपण सर्वांनी घरातच थांबावे असे ही सरकार वेळोवेळी सांगत आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी सुद्धा 3 वर्षीय चिमुकली ते वयोवृद्धांनी कोरोनावर मात केल्याची प्रकरण समोर आली होती.(Coronavirus: मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी, प्रभादेवी मधील 9 ठिकाणे कन्टेंमेंट झोन मधून वगळली)
#पुण्यामध्ये ९२ वर्षीय वृद्ध महिलेने केलं कोरोनवर मात. त्यांच्यासह कुटुंबातील ४ सदस्यांना कोरोणा विषाणूची लागण झाली होती, या चारही जणांना मंगळवारी घरी सोडण्यात आले ..#WarAgainstVirus
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) April 23, 2020
दरम्यान, पुण्यात मंगळवारी 64 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आकडा 700 च्या पार गेला आहे. तर पुण्याला सुद्धा रेड झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी पुण्यात नागरिक सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकला जात असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अद्दल घडवत रस्त्यावरच त्यांच्याकडून कसरत करुन घेतली होती. एकूणच महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 5218 वर आणि बळींची संख्या 251 वर पोहचली आहे.