File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

देशावर घोंगावणाऱ्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा प्रभाव मुंबई (Mumbai) शहरात वाढताना दिसत आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोना बाधित 6 रुग्ण आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर हा भाग पालिकेकडून सील करण्यात आला. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले. वरळी कोळीवाड्या पाठोपाठ धारावी परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने चिंता अधिक वाढली. त्यामुळे वर्दळीची, गर्दीची ठिकाणं पालिकेकडून सील करण्यात आली. तसंच या भागांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून या कॉन्टैमिनेटेड झोन्स आणि इतर दाटीवाटीच्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेकडून 10 कोरोना व्हायरसचे स्क्रिनिंग करणारे क्लिनिक्स आजपासून सुरु करण्यात येणार आहेत.

तसंच भाजीपाला इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी बाजारपेठा दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी बाजारपेठांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आता विशेष खबरादारी म्हणून  containment zones मध्ये कोरोनाची चाचणी करणारे दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत.

ANI Tweet:

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात कोरोना व्हायरसचा फैलाव रोखणे हे खरोखरंच एक आव्हान आहे. त्यामुळे डॉक्टरांसह वैद्यकीय सेवांवरचा ताण अधिक वाढला आहे. यासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील डॉक्टरांना एकत्र येऊन सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, यासाठी तब्बल 30000 स्वयंसेवी डॉक्टर्स पुढे आले आहेत.