Coronavirus | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ होऊ लागली आहे. याबाबत काळजी व्यक्त होऊ लागली असून मुंबईवर पुन्हा  लॉकडाऊनचे (Lockdown) संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत आज (28 फेब्रुवारी) एकूण 1 हजार 51 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 32 लाख 25 हजार 915 वर पोहचली आहे. यापैकी 3 लाख 3 हजार 860 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत 11 हजार 470 मृत्युची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 9 हजार 715 रुग्ण सक्रिय आहेत.

महाराष्ट्रात कोरोना अटोक्यात येत असल्याचे चिन्ह निर्माण झाले असतानाच राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून चित्र बदलू लागले आहे. मुंबईसह ग्रामीण भागात नवीन बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आजचा आकडा चिंताजनक आहे. हे देखील वाचा- COVID19 in Mumbai: मुंबईत लोकलमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ? पहा BMC ची आकडेवारी

ट्वीट-

महाराष्ट्रात काल 8 हजार 623 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर, 3 हजार 648 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. तसेच राज्यात आतापर्यंत एकूण 20 लाख 20 हजार 951 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 72 हजार 530 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.14% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.