चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात सुद्धा शिरकाव केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण झाल्याची 30 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभुमीवर सरकारने नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांना सुद्धा 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहिर केली आहे. ऐवढेच नाही तर गर्दीच्या ठिकाणी जाळ्याचे टाळावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. तर मुंबईतील राणीबाग नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुण्यात सर्वाधित कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने तेथील शाळा बंद केल्यानंतर आता अंगणवाड्या सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहे.
कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. तर राणीची बाग आता सरकारचे आदेश आल्यानंतरच पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारच्या निर्णयाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच राज्यातील सर्व खासगी, सरकारी, नगर पंचायत, नगर पालिका शाळा कोरोना व्हायरसमुळे बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परिक्षा वेळापत्रकानुसार पार पडणार असल्याचे ही महाराष्ट्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहीर)
दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसबाबत एक पुन्हा पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पिंपरी, चिंचवड आणि पुण्यातील शाळांना सुट्टी जाहिर केली होती. तसेच सिनेमागृह, जिम, नाट्यगृह, स्विमिंग पूल बंद ठेवण्यात यावे असा निर्णय दिला होता. रेल्वे आणि बस सेवा बंद करणे अशक्य असून जनतेने अनावश्यक प्रवास टाळावे. कोणत्याही कार्यक्रमांना सरकारकडून परवानगी देण्यात येणार नाही. राज्यातील खासगी क्षेत्रातील मालकांनी कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होमची सुविधा द्यावी असे आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्रात आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांना विलगीकरण कक्षात रुग्णांना ठेवण्यात आले आहेत. दुबई, फ्रान्स आणि अमेरिकेतून आलेले रुग्ण होते.