Ashish Shelar (Photo Credits: You Tube)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू नये म्हणून नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याची वेळ आणू देऊ नका असे ही सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र सरकार नागरिकांना नियामांचे पालन करण्याचे आदेश देत आहे. पण दुसऱ्या बाजूला सरकारने येत्या 31 मार्चला मुंबईत कर्फ्यू असताना सुद्धा महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक बोलावली असल्याने भाजप आमदार आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, कर्फ्यूची स्थिती असताना महापालिकेच्या समितीची बैठक का घेतली जात आहे. तर एखादा आरोग्याचा विषय सोडला तर काहीच महत्वाचा अजेंडा नसताना बैठकीचा अट्टाहास कशासाठी? संपूर्ण जग हे कोरोनाच्या विरोधात लढत आहे. मात्र पालिकेच्या स्टॅंडिंगमध्ये कसले अंडरस्टँडिंग सुरु आहे असा सवाल ही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांना सुद्धा पत्र लिहित याबाबत सांगण्यात आले आहे. त्यानुसार तुम्ही महापौर असून याबाबत लक्ष द्यावे अशी विनंती सुद्धा त्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.(Lockdown-COVID-19: कोरोना व्हायरस हेल्पलाईन नंबर; देशभरातील राज्यांसह पाहा तुमच्या राज्याचा Coronavirus Helpline Number)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात येत्या 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. तसेच महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाउनचे आदेश देण्यासोबत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन वारंवार करत आहेतआतापर्यंत राज्यात 34 जणांना डिस्चार्ज आणि कोरोना व्हायरसचे सक्रिया रुग्ण 155  असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.