नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा विविध राज्यातील वाढत चालला आहे. तर स्थानिक प्रशासनाकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तर नागपूर (Nagpur) मधील सतरंजीपूरातील 750 कोरोनाबाधित रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच अजून 500 जणांना याच परिसरातून क्वांरटाइन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी दिली आहे. नागपूरात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरीच्या पार गेला आहे. त्यामुळे तेथे सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. त्याचसोबत नागपूरात आता गर्भवती महिलांच्या चाचणीसाठी मोबाईल दवाखान्यांची सोय सुद्धा करण्यात आल्याची माहिती मुंढे यांनी सोमवारी दिली होती.

नागपूरात क्वारंटाइन करण्यात आलेल्यांना 80 परिसरामधून शोधून काढले आहे. अद्याप त्यात काही जणांचा सुद्धा शोध घेतला जात असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. तर काही दिवसांपूर्वी नागपूर महापालिकेकडून कोरोना संदर्भातील एक सर्वे केला होता. त्यामध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन विविध आजारांची माहिती जमा केली आहे. त्यानुसार सर्वेत असे समोर आले आहे की, 24 लाख लोक आणि 5.7 लाख घरांमधील माहिती जमा करण्यात आली आहे.(महाराष्ट्रात सद्य स्थितीत Coronavirus बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी, आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 8 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत येत्या 3 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार आहेत. परंतु 3 मे नंतर कोरोनाची एकूणच परिस्थिती पाहता निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे. मात्र ग्रीन झोन मधील नागरिकांना लॉकडाउन संदर्भातील परिसरांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.