महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा 3 हजारांच्या पार गेला आहे. याच पार्श्वभुमीवर लॉकडाउनचे आदेश सुद्धा वाढवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आता पुणे येथे आता 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील (Pune) एकूण मृतांचा आकडा 47 वर पोहचला आहे. तर आजच एका 47 वर्षीय महिलेचा कोरोनामुळ मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.पुण्यात 407 एकुण कोरोनाबाधित रूग्ण आहेत तर यापैकी 41 जण कोरोनामुक्तदेखील झाले आहेत.
पुण्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला कोरोनाबाधित रूग्ण होळीच्या पूर्वी आढळला होता. त्यानंतर सातत्याने पुणे शहरात कोरोनाबाधितांची वाढ होत आहे. पुण्यात आता भवानी पेठ परिसरातील नागरिकांमध्ये कोरोनाबाधितांचे आणि मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहेत.(पुणे: कोरोनाबाधित 2 मधुमेही रूग्णांचा आज मृत्यू; पुण्यात Covid 19 मुळे बळी गेलेल्यांचा आकडा 46)
A 55 years old COVID19 patient passes away in Pune. The patient had comorbid conditions; the total death toll in Pune now stands to 47: Pune Health Officials https://t.co/iaSojymQHW
— ANI (@ANI) April 16, 2020
दरम्यान, महाराष्ट्र राज्याची तीन झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्येनुसार ही विभागणी करण्यात येणार आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन , 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. लॉकडाऊन संदर्भात कोणतेही नियम रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये शिथिल केले जाणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.