मुंबई सह पुण्यामध्ये वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा हा महाराष्ट्राची चिंता वाढवणारा आहे. दरम्यान आज पुण्यामध्ये एका 54 वर्षीय आणि एका 47 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील 54 वर्षीय कोरोनाबाधित रूग्ण हा मधुमेही होता तर 47 वर्षीय कोरोनाबाधित महिला देखील मधुमेहाची रूग्ण होती. त्यामुळे आज पुणे शहरात एकूण कोरोनाबाधित रूग्णांच्या मृतांचा आकडा 46 वर पोहचला आहे. कोरोनासोबत मधुमेह, उच्च रक्तदाब, हृद्यविकार असे आजार असल्यास रूग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमजोर पडते आणि कोरोनाचा सामना करण्याची क्षमता कमी होते. आज पुण्यात पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या विभागात 4 तर पुणे महानगर पालिकेच्या विभगात 19 नवे रुग्ण आढळले आहेत. Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्र राज्यात आज 165 नव्या रुग्णांची नोंद; राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 3000 च्या पार.
पुण्यात 407 एकुण कोरोनाबाधित रूग्ण आहेत तर यापैकी 41 जण कोरोनामुक्तदेखील झाले आहेत. पुण्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला कोरोनाबाधित रूग्ण होळीच्या पूर्वी आढळला होता. त्यानंतर सातत्याने पुणे शहरात कोरोनाबाधितांची वाढ होत आहे. पुण्यात आता भवानी पेठ परिसरातील नागरिकांमध्ये कोरोनाबाधितांचे आणि मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं आहे.
ANI Tweet
A 54-year-old COVID19 patient suffering from diabetic ketoacidosis and a 47-year old woman COVID19 patient suffering from diabetic nephropathy passed away today; total death in Pune rises to 46: Pune Health officials
— ANI (@ANI) April 16, 2020
आज आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 165 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 3081 वर पोहचला आहे. आज मुंबईमध्ये 107 नवे रुग्ण आढळले असून अहमदनगर-1, चंद्रपूर-1, मालेगाव-4, नागपूर- 1, नागपूर मनपा- 10, नवी मुंबई मनपा-2, पनवेल मनपा- 1, ठाणे- 3, ठाणे मनपा- 9, ठाणे जिल्हा- 1, वसई विरार मनपा-2, पिंपरी-चिंचवड- 4, पुणे- 19 असे नवीन रुग्ण सापडले आहेत.