Union Minister Prakash Javadekar | (Photo Credit: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांनी आगोदरच आदेश दिला आहे. त्यामुळे देशात सध्या सुरु असलेला लॉकडाऊन (Lockdown) 14 एप्रिल नंतर अधिक पुढे वाढवला जाणार नाही, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Information And Broadcasting Minister Prakash Javadekar) यांनी दिली आहे. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात देशातील जनतेने मोठे सहकार्य केले आहे. कोरोना व्हायरस बाबत बोलायचे तर इतर देशांच्या तुलनेत भारत अधिक शक्तिशाली आहे, असेही जावडेकर (Prakash Javadekar) म्हणाले.

प्रकाश जावडेकर हे एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी  बोलत होते. या वेळी बोलताना जावडेकर यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात आपण सुरुवातीपासूनच अतिशय जागृक राहिलो. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या संकटात भारताला फारशी हानी पोहोचली नाही. उदाहरणच द्यायचे तर महासत्ता असलेला अमेरिका गाफील राहिला. त्याची फळे आज अमेरिका भोगतो आहे. भारताने मात्र योग्य वेळी कर्तव्यदक्षता दाखवली त्यामुळे कोरोना विरुद्धचा लढा भारत यशस्वीपणे लढू शकला.

मरकजमध्ये पोहोचलेल्या सर्व नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. सुमारे 75 टक्के जनतेने लॉकडाऊन यशस्वीपणे पाळले. नागरिकांना घरात बसून कंटाळा येऊ नये. तसेच, त्यांची काही वेळ करमणूक व्हावी. लॉकडाऊन यशस्वी व्हावा. कोरोना व्हायरस संकटावर मात करता यावी यासाठी दूरदर्शन वहिनीवरुन रामायण, महाभार, यांसारखे कार्यक्रम पुन्हा प्रसारीत करण्यात आले, असेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले. दूरदर्शनवरुन रामायण महाभारत हे कार्यक्रम जनतेच्या आग्रहावरुनच सुरु करण्यात आल्याचेही ते म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus: गेल्या 24 तासात 386 नव्या रुग्णांची नोंद, देशातील कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा 1637: केंद्रीय आरोग्य मंत्रालय)

दरम्यान, राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 302 इतकी झाली आहे. त्यातील 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, देशाचा विचार करता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 386 नव्या कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही आता 1637 इतकी झाली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 132 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 38 जणांचा मृत्यू झाला आहे.