प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

एकीकडे राज्यामध्ये लॉक डाऊनच्या (Lockdown) बाबतीत बरीच शिथिलता देण्यात आली आहे, तर दुसरीकडे कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांच्या संख्येमध्ये अजूनही वाढ होताना दिसत आहे. आज महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये (Mumbai) कोरोनाच्या 2,848 रुग्णांची नोंद झाली असून, यासह एकूण संक्रमितांची संख्या 2,19,938 वर पोहोचली आहे. आज शहरामध्ये 2,257 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 1,83,742 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 24,783 साकीर्य रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरामध्ये 46 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 9245 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 39 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 33 रुग्ण पुरुष व 13 रुग्ण महिला होत्या. 1 व्यक्तीचे वय 40 वर्षा खाली होते. 29 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 16 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 83 टक्के आहे. 30 सप्टेंबर ते 06 ऑक्टोबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.04 टक्के होता. 06 ऑक्टोबर 2020 पर्यंत मुंबईमध्ये झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 12,04,081 झाल्या आहेत, तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 67 दिवस आहे. (हेही वाचा: आता कोरोना विषाणू लस बनवण्याच्या शर्यतीमध्ये Reliance ची उडी; जाणून घ्या कधी सुरु होणार ट्रायल)

सध्या मुंबईमध्ये सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 651 आहे, तर सक्रिय सीलबंद इमारती 10,097 आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी, ‘माझे कुटुंब - माझी जबाबदारी' मोहिल राबवली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज 14,578 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 16,715 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 11,96,441 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2,44,527 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.81% झाले आहे.