मुंबई (Mumbai) मधील कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. आज शहरामध्ये 2,236 रुग्णांची नोंद झाली असून, यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,84,313 वर पोहोचली आहे. यामध्ये समाधानाची बाबा म्हणजे आज मुंबईमध्ये कोरोनाचे 5,038 रुग्ण बरे झाले आहेत, यासह आतापर्यंत बरे झालेल्या कोरोना विषाणू रुग्णांची संख्या 1,47,807 वर पोहोचली आहे. सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होऊन, सध्या 27,664 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरामध्ये कोरोनाच्या 44 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 8,466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे.
आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 33 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 33 रुग्ण पुरुष व 11 रुग्ण महिला होत्या. यातील 1 जणांचे वय 40 वर्षा खाली होते. 29 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 14 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर आता 80 टक्के झाला आहे. 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.22 टक्के राहिला आहे. 19 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 10,04,017 झाल्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 57 दिवसांवर आला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र पोलीस दलात गेल्या 24 तासात आणखी 198 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; आकडा 21,152 वर पोहचला)
पहा ट्वीट -
Mumbai reported 2,236 new COVID-19 cases, 5,038 recoveries and 44 deaths in the last 24 hours, taking total cases to 1,84,313 including 1,47,807 recoveries, 8,466 deaths and 27,664 active cases: Brihanmumbai Municipal Corporation (BMC), Maharashtra pic.twitter.com/13GKuL3l23
— ANI (@ANI) September 20, 2020
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 19 सप्टेंबर नुसार सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 609 आहे, तर सक्रिय सीलबंद इमारती या 9,527 इतक्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आज 20,598 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 26,408 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 884341 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2,91,238 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 73.17% झाले आहे.