
महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ पहायला मिळत आहे. यामध्ये मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये आणि स्वप्ननगरीमध्ये पुन्हा कोरोनाच्या रूग्णसंख्येमध्ये वाडः पहायला मिळत आहे. आता मुंबईला पुन्हा कोरोनाचा विळखा बसत असल्याने बीएमसी अॅक्शन मोड वर गेली आहे. बीएमसीच्या नव्या नियमांनुसार आता एका इमारतीमध्ये 5 रूग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार बीएमसीच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीप्रमाणे 20 फेब्रुवारी पर्यंत मुंबईमध्ये 1017 अॅक्टिव्ह इमारती सील करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक इमारती या बीएमसीच्या टी वॉर्ड मध्ये आणि पीएस वॉर्ड मध्ये आहेत. Mumbai Police: मास्क न घातलेल्या नागरिकांकडून मुंबई पोलीस दंड आकारणार.
मुंबई मध्ये 20 फेब्रुवारी पर्यंत टी वॉर्ड म्हणजेच मुलुंड परिसरामध्ये सर्वाधिक 204 इमारती सील झाल्या आहेत तर पी साऊथ म्हणजे गोरेगाव भागात 125 इमारती सील झाल्या आहेत. बीएमसीने आता नियमावली कडक करत होम क्वारंटीनचा पर्याय बंद करत सर्वांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितले आहे. तसेच इमारतीमध्ये एका 2 कोरोना रूग्ण आढळल्यास त्यांचा मजला सील करण्यात येत आहे. इथे पहा मुंबईतील करोना परिस्थितिचा सविस्तर अहवाल.
मुंबईमध्ये काल (21 फेब्रुवारी) आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,मागील 24 तासांत 921 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 4 जणांच्या मृत्यू झाला आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाणही वाढल्याचं निदर्शनास आले आहे. हा दर 4 टक्क्यांवरून 6 टक्क्यांच्याही पुढे गेला आहे.