Coronavirus in Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 533 नव्या रुग्णांसह 3 जणांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 17,972
Maharashtra Police | (File Photo)

मार्च महिन्यापासून सुरु झालेला कोरोनाचा प्रादुर्भावाने देशासह राज्यात थैमान घालायला सुरुवात केली आहे. दिवसागणित रुग्णसंख्या वाढत असून महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) दलाभोवती देखील कोरोनाचा तीव्र विळखा बसला आहे. मागील 24 तासांत महाराष्ट्र पोलिस दलात 533 नवे रुग्ण आढळून आले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीमुळे महाराष्ट्र पोलिस दलातील कोरोना बाधितांचा आकडा 17,972 वर पोहचला आहे. त्यापैकी 3,523 अॅक्टीव्ह केसेस (Active Cases)असून 14,269 पोलिसांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दरम्यान कोरोना संसर्गामुळे एकूण 180 पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

कोरोना संकटात पोलिस कर्मचाऱ्यांवरील भार अधिक वाढला आहे. लॉकडाऊन आणि त्यानंतर अनलॉक या टप्प्यात नियम पायदळी तुडवले जावू नये म्हणून पोलिस तत्पर होते. तसंच नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील त्यांच्यावर होती. या काळात अगदी जीवावर उदार होत पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले. काही प्रसंगी कर्तव्यापलिकडे जात पोलिसांनी नागरिकांची मदत केली.

ANI Tweet:

कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी असून मागील 24 तासांत 20 हजार पेक्षा अधिक नवे रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. सध्या राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 9,43,772 वर पोहचला असून त्यापैकी 2,43,446 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 6,72,556 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील एकूण कोरोना संसर्गाने बळी गेलेल्यांची संख्या 27,407 झाली आहे.