Coronavirus in Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात 15,591 कोरोना बाधित; एकूण 158 पोलिसांचा मृत्यू
Maharashtra Police | (File Photo)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात नागरिकांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि कायद्याची पायमल्ली होणार नाही यासाठी सतर्क असलेले पोलिसही कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. महाराष्ट्र पोलिस दलातील (Maharashtra Police) एकूण 15,591 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 12,640 पोलिसांनी कोरोना संसर्गावर यशस्वीरीत्या मात केली आहे. तर 158 पोलिसांचा यात मृत्यू झाला आहे. दरम्यान सध्या 2793 कोरोना बाधित पोलिसांवर उपचार सुरु आहेत.

कोरोना व्हायरस संसर्गाच्या संकट काळात पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेऊन लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याकडे लक्ष दिले. अनेकदा कर्तव्यापलिकडे जात गरजूंची मदत केली. दरम्यान पोलिसांच्या या मेहनतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. (Coronavirus Update: मुंंबई, पुणे सहित महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा आकडेवारी)

ANI Tweet:

दरम्यान कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र सुरुवातीपासूनच अग्रस्थानी आहे. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. परंतु, वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. तरी कोविड-19 चे संकट अद्याप टळलेले नाही. त्यातच अनलॉक 4 ला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पोलिसांवरील कायदा, सुव्यवस्था राखण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक वाढली आहे. दरम्यान अनेक राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांचा धोका देखील वाढत आहे.