देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या शहरांमध्ये मुंबई अव्वलस्थानी आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात या भागात संचारबंदी पाळणं महत्त्वाचे आहे. मायानगरी मुंबईमध्ये देशा-परदेशातून नागरिक येतात त्यामुळे या शहरात कोरोनाचा धोका अधिक आहे. जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी सध्या अनेक ठिकाणी गर्दी होत आहे. अशावेळेस गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी आता मुंबई पोलिस ड्रोनची मदत घेणार आहे. त्यामुळे कर्फ्यूच्या काळात नेमकी कुठे आणि का गर्दी होतोय? यावर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. कालच मुंबई पोलिसांनी नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी बाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत. आता मुंबई पोलिस घरीच येऊन आपली तक्रार नोंदवू शकणार आहेत. Coronavirus Outbreak: 'पप्पा बाहेर जाऊ नका ना बाहेर कोरोना आहे' पोलिस कर्मचार्याच्या चिमुकल्याची केविलवाणी साद (Watch Video).
महाराष्ट्रात पुणे, पिंपरी चिंचवड सह यवतमाळ, नागपूर, रायगड, रत्नागिरी पर्यंत पोहचला आहे. लॉकडाऊनचे आदेश धुडकावून अनेक जण रस्त्यावर येत आहेत अशा नागरिकांना मुंबई पोलिसांकडून चांगलाच प्रसाद देखील मिळत आहे. सध्या मुंबईत सर्वत्र लक्ष ठेवण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ नाही. मात्र आता तंत्रज्ञानाची मदत घेत पोलिस गर्दी आटोक्यात ठेवू शकतात.
ANI Tweet
#WATCH Maharashtra: Mumbai Police makes use of drones to monitor the situation and to check the movement of people in the city, amid curfew. #Coronavirus pic.twitter.com/CU2C9hB0i2
— ANI (@ANI) March 25, 2020
सध्या भारत देशामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 600 च्या पार गेला आहे तर महाराष्ट्र राज्यात 122 जण कोरोनाबधित आहेत. जगभरात सध्या कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. इटली, स्पेन, अमेरिका मध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यूचा आकडा भयावह आहे.