Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: IANS)

संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) महाराष्ट्रात शिरकाव केल्यानंतर दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नवी मुंबईतील (Navi Mumbai) ऐरोली (Airoli) येथे माईन्ड स्पेस (Mindpsace) बिल्डिंग नंबर 11 मध्ये एक कोरोना व्हायरस बाधित रुग्ण सापडला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कोरोनाग्रस्त व्यक्ती Majesco कंपनीचा कर्मचारी असून ऐरोली ऑफिसमध्ये तो 9-12 मार्च दरम्यान उपस्थित होता. या ब्लिडिंगमध्ये eClerx, Atos आणि Citus Tech यांसारख्या अनेक कंपन्या असल्यामुळे विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळेच 15 मार्च दिवशी सर्व कंपन्या बंद ठेवण्यात येणार असून ऑफिसेस स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यात ऑफिसेस बाहेरील लॉबीज, जिने, लिफ्ट स्वच्छ करण्यात येणार आहेत. (पिंपरी चिंचवड येथे आणखी 5 जणांना कोरोना व्हायरस बाधला, COVID 19 रुग्णांची राज्यातील संख्या 31 वर पोहोचली)

तसंच सुरक्षिततेसाठी Majesco च्या कर्मचाऱ्यांना 29 मार्च पर्यंत ऑफिसला न येण्याच्या सूचना देण्यात आल्या असून 'वर्क फ्रॉम होम' करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर इतर कंपन्या सफाईनंतर नेहमीप्रमाणे सुरु राहतील.

पहा व्हिडिओ:

आतापर्यंत राज्यात कोरोना व्हायसरचे सर्वाधिक म्हणजेच 31 रुग्ण आढळून आले आहेत. तर देशातील रुग्णांची संख्या 90 वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, सिने-नाट्यगृह, मॉल्स, जिम आणि स्विमिंग पूल्स 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.