Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसागणित नव्या रुग्णांची मोठी भर पडत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 56948 इतकी झाली आहे. त्यापैकी 37125 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 17918 रुग्णांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात एकूण 1897 कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या दिवसात राज्यात सर्वाधिक म्हणजेच 105 मृत्यू झाले आहेत. तर तब्बल 2190 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळेच राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी 'मीच माझा रक्षक' हा आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिलेला कानमंत्र लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. (Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 1,58,333 वर; मागील 24 तासांत 6,566 नवे रुग्ण)

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या शहारांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या शहरांसह राज्याच्या विविध जिल्ह्यात कोरोना व्हायरस रुग्णसंख्या, मृतांचा आकडा किती आहे जाणून घेऊया. कोरोना रुग्णांची जिल्हा आणि मनपा निहाय आकडेवारी ही महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आली आहे. ही आकडेवारी 27 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.

COVID-19 पॉझिटीव्ह रुग्णांची जिल्हा/मनपा निहाय यादी:

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 34018 1097
2 ठाणे 510 5
3 ठाणे मनपा 3048 68
4 नवी मुंबई मनपा 2294 39
5 कल्याण डोंबिवली मनपा 1052 18
6 उल्हासनगर मनपा 214 6
7 भिवंडी निजामपूर मनपा 100 3
8 मीरा भाईंदर 563 10
9 पालघर 126 3
10 वसई विरार मनपा 645 16
11 रायगड 502 12
12 पनवेल मनपा 394 13
ठाणे मंडळ एकूण 43466 1290
1 नाशिक 128 0
2 नाशिक मनपा 162 5
3 मालेगाव मनपा 722 47
4 अहमदनगर 67 6
5 अहमदनगर मनपा 20 0
6 धुळे 29 3
7 धुळे मनपा 100 6
8 जळगाव 365 46
9 जळगाव मनपा 140 5
10 नंदुरबार 32 2
नाशिक मंडळ एकूण 1765 121
1 पुणे 410 8
2 पुणे मनपा 5830 276
3 पिंपरी-चिंचवड मनपा 374 7
4 सोलापूर 27 2
5 सोलापूर मनपा 652 50
6 सातारा 395 7
पुणे मंडळ एकुण 7688 350
1 कोल्हापूर 318 1
2 कोल्हापूर मनपा 28 0
3 सांगली 83 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 11 1
5 सिंधुदुर्ग 19 0
6 रत्नागिरी 192 5
कोल्हापूर मंडळ एकूण 651 7
1 औरंगाबाद 26 1
2 औरंगाबाद मनपा 1309 56
3 जालना 79 0
4 हिंगोली 133 0
5 परभणी 19 1
6 परभणी मनपा 6 0
औरंगाबाद मंडळ एकूण 1572 58
1 लातूर 85 3
2 लातूर मनपा 9 0
3 उस्मानाबाद 45 0
5 बीड 40 0
6 नांदेड 19 0
7 नांदेड मनपा 86 5
लातूर मंडळ एकूण 284 8
1 अकोला 39 5
2 अकोला मनपा 448 18
3 अमरावती 16 2
4 अमवरावती मनपा 178 12
5 यवतमाळ 115 0
6 बुलढाणा 53 3
7 वाशीम 8 0
अकोला मंडळ एकूण 857 40
1 नागपूर 9 0
2 नागपूर मनपा 475 9
3 वर्धा 10 1
4 भंडारा 19 0
5 गोंदिया 48 0
6 चंद्रपूर 16 0
7 चंद्रपूर मनपा 9 0
8 गडचिरोली 26 0
नागपूर मंडळ एकूण 612 10
1 इतर राज्य 53 13
एकूण 56948 1897

देशातील कोरोना बाधितांची संख्या 158333 इतकी झाली असून 4531 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. देशातील 158333 रुग्णांपैकी तब्बल 56948 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्यातील वाढता कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकार विविध स्तरावर प्रयत्न करत आहे. तसंच लॉकडाऊन 4 लवकरच संपणार असून 1 जून पुढील राज्याचे स्वरुप जनतेसमोर अद्याप स्पष्ट झालेले नाही.