रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांची कोरोना व्हायरस (Coronavirus ) चाचणी पॉझिटीव्ह (Rashmi Thackeray Tested Positive for COVID 19) आल्याचे वृत्त आहे. रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी आहेत. या आधी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार, कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्याने त्यांची चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली.
रश्मी ठाकरे यांच्यावर डॉक्टर लक्ष ठेऊन आहेत. त्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान वर्षा बंगल्यावरच क्वारंटाईन होणार आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबई येथील जेजे रुग्णालयात कोरोना लस घेतली होती.
आदित्य ठाकरे यांनी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याबाबतची माहिती ट्विटरवरुन दिली. आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.' (हेही वाचा, Aaditya Thackeray Tests Positive for COVID19: महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण; नागरिकांना केली 'अशी' विनंती)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना संकटाबाबत कामलीचे गंभीर आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी ते मास्क लावण्याते आणि हात धुण्याचे अवाहन करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचेही उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा केले आहे. स्वत: मुख्यमंत्रीही प्रचंड काळजी घेताना दिसून आले आहेत. असे असतानाही अखेर कोरोना विषाणूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरात प्रवेश केलाच.