Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. त्यामुळे देशात कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण ठेवायचं असेल तर महाराष्ट्रात त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे. दरम्यान यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता नाशिक मधील मालेगावातही कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याने सामान्यांच्या मनात भीती आणि चिंतेचे प्रमाण वाढत आहे. सध्या भारतामध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजारांच्या पार गेला आहे. अशामध्ये पहा महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये कुठे कोणत्या भागांत कोरोनाबाधितांचाआकडा किती पर्यंत पोहचला आहे.  Coronavirus In India: भारतामध्ये 24 तासांमध्ये वाढले 1718 नवे रूग्ण कोरोनाबाधितांचा आकडा 33050 वर!

नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आता 276 वर पोहचला आहे. दरम्यान यामध्ये 71 सामान्य नागरिक आणि 6 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील कोव्हिड 19 च्या हॉट्सस्पॉट्सपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये आज मागील 12 तासामध्ये 127 नव्या रूग्णांची भर पडली आहे. पुण्यामध्ये आता कोरोनाबाधितांचा आकडा 1722 पर्यंत पोहचली आहे. महाराष्ट्र राज्याच्या आकडेवारीचा ताजा रिपोर्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा आणि PDF डाऊनलोड करा.

 

कोविड-१९ महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती 
अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई मनपा ६१६९ २४४
ठाणे ४५
ठाणे मनपा ३४४
नवी मुंबई मनपा १४२
कल्याण डोंबिवली मनपा १५३
उल्हासनगर मनपा
भिवंडी निजामपूर मनपा १४
मीरा भाईंदर १२३
पालघर ४१
१० वसई विरार मनपा १२३
११ रायगड २२
१२ पनवेल मनपा ४४
ठाणे मंडळ एकूण ७२२३ २३६
नाशिक
नाशिक मनपा १९
मालेगाव मनपा १७१ १२
अहमदनगर २६
अहमदनगर मनपा १६
धुळे
धुळे मनपा १७
जळगाव ३०
जळगाव मनपा १०
१० नंदुरबार ११
नाशिक मंडळ एकूण ३१३ २७
पुणे ५८
पुणे मनपा १०४४ ७६
पिंप्री-चिंचवड मनपा ७२
सोलापूर
सोलापूर मनपा ७५
सातारा ३२
पुणे मंडळ एकुण १२८८ ८९
कोल्हापूर
कोल्हापूर मनपा
सांगली २६
सांगली मिरज कुपवाड मनपा
सिंधुदुर्ग
रत्नागिरी
कोल्हापूर मंडळ एकुण ४८
औरंगाबाद
औरंगाबाद मनपा ८९
जालना
हिंगोली १५
परभणी
परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण १०८
लातूर १२
लातूर मनपा
उस्मानाबाद
बीड
नांदेड
नांदेड मनपा
लातूर मंडळ एकूण १९
अकोला १२
अकोला मनपा २२
अमरावती
अमवरावती मनपा २६
यवतमाळ ७१
बुलढाणा २१
वाशीम
अकोला मंडळ एकूण १५५
नागपूर
नागपूर मनपा १३१
वर्धा
भंडारा
गोंदिया
चंद्रपूर
चंद्रपूर मनपा
गडचिरोली
नागपूर मंडळ एकूण १३९
इतर राज्य २५
एकूण ९३१८ ४००

शेवटचे अद्यावत दि. २७ एप्रिल २०२०, सायं ६.००

भारतामध्ये आज (30 एप्रिल) च्या सकाळी कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा 33050 पर्यंत पोहचला आहे. दरम्यान यापैकी 8324 रूग्णांनी या आजारावर मात केली असून कोव्हिड 19 या जगभर धुमाकूळ घालणार्‍या आजाराने भारतामध्ये 1074 जणांचे प्राण गेले आहेत. मागील 24 तासामध्ये 1718 नव्या रूग्णांची भर पडली आहे तर 67 जणांचा बळी गेला आहे.