Coronavirus outbreak (Photo Credits: IANS)

महाराष्ट्र राज्यात आज (13 एप्रिल) 82 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 2064 वर पोहचली आहे. यामध्ये मुंबई शहरात नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 59 आहे. दरम्यान महाराष्ट्रात पहिला कोरोनाबाधित रूग्ण 7 मार्चच्या आसपास सापडला होता. त्यानंतर सातत्याने राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असताना दिसली आहे. राज्यातील ही स्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन आता किमान 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई: महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोरोनाबधित पोलिसाच्या संपर्कात आल्याने घेतला Home Quarantine मध्ये राहण्याचा निर्णय

दरम्यान मुंबई शहरात धारावी, वरळी कोळीवाडा हे भाग कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट असल्याने येथे  कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे. दरम्यान आता कोरोनासाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कोरोना लक्षणाच्या गांभीर्यानुसार वेगवेगळे बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. आज लालाबागमधील गणेशगल्ली भाग देखील कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. धारावी मध्ये 4 नवे COVID-19 रुग्ण, या परिसरातील कोरोना बाधितांची संख्या 47 वर.

आज देशामधील कोरोनाबाधितांचा आकडा देखील 9000 च्या पार गेला आहे. भारतामध्ये सध्या 9152 कोरोनाबाधित असून त्यापैकी 7987 लोकांवर देशभरात सरकारी आणि खाजगी रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर 856 लोकं कोरोनामुक्त देखील झाले आहे. त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे. तर कोरोनामुळे भारतामध्ये बळी गेलेल्यांची संख्या 308 पर्यंत पोहचली आहे. दिवसागणिक वाढणारी ही कोरोनाबाधितांची संख्या नागरिकांच्या मनात भीती तसेच अस्वस्थता निर्माण करत आहे. Coronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 9152; मागील 24 तासांमध्ये 35 जण Covid 19 चे बळी.  

ANI Tweet

काही वेळापूर्वीच महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड देखील कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कात आल्याने होम क्वारंटीनमध्ये असल्याचे वृत्त आले आहे. दरम्यान त्यांची चाचणी करून अहवाल येईपर्यंत ते होम क्वारंटीन राहणार आहेत.