Coronavirus In Maharashtra: पुण्यामध्ये 42 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबल व त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण
Police | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

महाराष्ट्रातील कोरोनाचं हॉटस्पॉट असलेल्यापैकी पुणे शहरामध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलला आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान हा पोलिस कॉन्स्टेबल 42 वर्षीय असल्याची माहिती पुण्याचे पोलिस जॉईंट कमिशंर डॉ. रविंद्र शिसवे (Dr Ravindra Shisve) यांनी दिली आहे. दरम्यान सध्या पुण्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 504 असून 47 जणांचा मृत्यू झाला असून 43 जण कोरोनामुक्त झाल्याने घरी पाठवण्यात आले आहेत. पुण्याच्या भवानी पेठेत कोरोनाचं थैमान मागील काही दिवसांपासून पहायला मिळालं होतं. मात्र आता त्यावर हळूहळू नियंत्रण मिळवण्यास यश येत आहे. Coronavirus: महाराष्ट्रात आतापर्यंत 23 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह.  

दरम्यान महाराष्ट्रात 24 मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी पुणे पोलिस जागोजागी रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहेत. अशांपैकीच एका पोलिस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. तर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आतापर्यंत 23 पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. Coronavirus Outbreak: भारतातील पहिलं 'संजिवनी' मोबाइल सॅनीटायजेशन युनीट पुणे शहरात दाखल; पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खास सोय.  

ANI Tweet    

महाराष्ट्र पोलिस कर्मचार्‍यांना सध्या लॉकडाऊनच्या काळात सुमारे 12-16 तास काम करावं लागत आहे. यामध्ये पोलिसांना कोरोनाची लागण होण्याची सर्वाधिक भीती असते. मात्र अशा ऑन ड्युटी पोलिस कर्मचार्‍यांसाठी खास सॅनिटाईज करणार्‍या मोबाईल व्हॅन चालवल्या जात आहेत. यामध्ये निर्जंतुक करणारे फवारे अंगावर मारले जात असल्याने पोलिसांवरील धोका कमी करण्यासाठी मदत होत आहे.