महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा धोका रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबतच पालिका कर्मचारी आणि पोलिस प्रशासनाचे कर्मचारी देखील जीव धोक्यात घालून काम करत आहेत. राज्यात संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र यामध्ये पोलिस कर्मचारी आणि पालिकेच्या अन्य सफाई कामगारांना सुरक्षित ठेवण्यासाठी आता मोबाइल सॅनीटाय्जेशन युनीट (Mobile Sanitisation Unit ) बनवण्यात आलं आहे. 'संजिवनी' असं या व्हॅनचं नाव असून पुणे शहरात देशातील अशाप्रकारचं पहिलं युनिट सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. त्यांनी या युनिटचा खास व्हिडिओ सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबई पोलिसांना खास सॅनिटायझर आणि विशेष मास्क यांचं वाटप केलं होतं.
मुंबईसह राज्यात सार्या जिल्ह्यांच्या हद्दी बंद करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना संचारबंदी आहे. कोव्हिड 19चा रूग्ण आढळल्यास नजिकचा भाग सील केला जात आहे. यामध्ये अनेक प्रसंगांमध्ये पोलिस आणि स्थानिकांमध्ये हमरीतुमरी पहायला मिळत आहे. मात्र सध्या पोलिस प्रशासन यंत्रणेतील कर्मचार्यांसोबत अनेक अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी 12-16 तास काम करत आहेत. अशावेळेस कोरोना व्हायरसच्या विळख्यात पोलिस प्रशासनासोबत इतर कर्मचारी येऊ नयेत यासाठी हे विशेष खबरदारीचे उपाय घेण्यात आले आहे. या व्हॅनमध्ये काही सेकंदामध्ये व्यक्तीला सॅनिटाईज करण्याची क्षमता आहे. त्यामुळे ऑन ड्युटी कर्मचार्यांना कोरोना व्हायरसपासून सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे. Coronavirus विरूद्धच्या लढाईत बाबा आमटेंच्या परिवाराकडून सरकारला Multi-layered Cloth Masks ची मदत; आनंदवन मध्ये निर्मिती.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ट्वीट
भारतातलं प्रथम मोबाइल सॅनीटाय्जेशन युनीट पुण्यात कार्यरत झालंय. यामुळे
संसर्ग व प्रादुर्भावाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रांमध्ये काम करणारे पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोगय सुरक्षितता सांभाळली जाईल.#MaharashtraGovtCares#WarOnCorona pic.twitter.com/2PusNDkEuh
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 6, 2020
देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र राज्यात आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड अशा मेट्रो सिटींमध्ये कोरोनाचा वाढता धोका पाहता आता नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी घरीच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. आज सकाळी 33 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा 781 वर पोहचला आहे.