जगात थैमान घालणारा कोरोना व्हायरस आता महाराष्ट्रासह मुंबई शहरातही झपाट्याने वाढत आहे. आज राज्यात 23 नव्या रूग्णांची वाढ झाल्याने आता महाराष्ट्रात एकूण 891 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. ANI Tweet नुसार, आज राज्यात सांगलीत 1, पिंपरी चिंचवडमध्ये 4, अहमदनगरमध्ये 3, बुलढाणा मध्ये 2, मुंबई शहरात 10, ठाण्यात 1 तर नागपूरमध्ये 2 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. सध्या यांच्यावर स्थानिक रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. देशामध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4421 वर पोहचला आहे. त्यापैकी 3981 जणांवर उपचार सुरू आहेत. 326 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर 114 जणांनी जीव गमावला आहे. Coronavirus: 2 नव्या रुग्णांसह धारावी येथे 7, अहमदनगर येथे 25 कोरोना व्हायरस रुग्ण.
मुंबई शहरामध्ये प्रामुख्याने कोरोनाबाधित असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आज धारावी परिसरामध्येही 2 नवे रूग्ण आढळल्याने आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीमधील दिवसेंदिवस कोरोनाचं संकट गडद होत आहे. मुंबई शहरात सध्या कोरोनाचे 8 हॉटस्पॉट आहेत. ठाणे: Coronavirus Lockdown चे नियम कडक दूध, भाजीपाला दुकानं बंद मात्र ठाणे महानगरपालिकेच्या योजनेनुसार इथे मिळणार किराणा, भाजीपाला आणि औषधांची घरपोच डिलीव्हरी.
ANI Tweet
23 new #Coronavirus positive cases reported in Maharashtra today - Sangali 1, Pimpri-Chinchwad 4, Ahmednagar 3, Buldhana 2. BMC 10, Thane 1 & Nagpur 2. The total number of positive cases in the state rises to 891. pic.twitter.com/reUnosaqoR
— ANI (@ANI) April 7, 2020
भारतामध्ये कोरोना व्हायरसची साखळी तोडायची असेल तर नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन केलं आहे. यासाठी नागरिकांना घरीच रहा आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळा असं आवाहन करण्यात आलं आहे.