Coronavirus In Maharashtra: 162 नव्या कोरोना रुग्णांसह महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांची संख्या 1297 वर पोहचली
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या देशासह महाराष्ट्र राज्यातही सातत्याने वाढताना दिसत आहे. राज्यात कोरोनाचे 162 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 1297 वर पोहचली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्क झाले आहे. आरोग्य सुविधांकडे राज्य सरकार विशेष लक्ष देत आहे. राज्यात फिव्हर क्लिनिक्स, कोरोना बाधितांसाठी विशेष हॉस्पिटल्स अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही माहिती काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. (कोरोनाला रोखण्यासाठी फीवर क्लिनिक्स ते सुसज्ज हॉस्पिटल महाराष्ट्र सरकारचा मास्टर प्लॅन; जाणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फेसबूक लाईव्ह मधील महत्त्वाचे मुद्दे)

राज्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत असल्याने मुंबई महानगरपालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. आता घराबाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही BMC ने स्पष्ट केले आहे. तसंच कोरोनाची चाचणी झटपट करता यावी याकरता बीएमसी 1 लाख रॅपिड किट्सची निर्मिती करणार आहे.

ANI Tweet:

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 540 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 5734 वर पोहचला आहे. तर 17 जणांचा यात मृत्यू झाला आहे. दरम्यान बरे झालेल्या 473 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर देशात आतापर्यंत 166 कोरोना बाधितांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.