Coronavirus: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना टास्क फोर्स नेमणार COVID 19 प्रसाराला आळा घालणार - अमित देशमुख
Amit Deshmukh | (Photo Credits: Twitter)

राज्याप्रमाणे आता जिल्हा पातळीवरही कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट निवारणासाठी स्वतंत्र कोरोना टास्क फोर्स (Corona Task Force) तयार करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध डॉक्टरांचा समावेश असेल. हे डॉक्टर जिल्ह्यातील कोरोना व्हायरस प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी काम आणि मार्गदर्शन करणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री (Medical Education Minister) अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा पातळीवर टास्क फोर्स तयार करण्यााबत कळविण्यात यावे असे निर्देश अमित देशमुख यांनी राज्यातील वैद्यकीय सचिवांना दिले आहेत. राज्यात सध्या साथरोग अधीनियम 1897 लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा पातळीवर कोरोना व्हायरस संकटावर मात करण्यासाठी टास्क फोर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकेल असा विश्वासही अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक COVID 19 संक्रमित, मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु)

कसा असेल टास्क फोर्स?

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी नामवंत मंडळी आहे. यात डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रात इतर काम करणाऱ्या जाणकारांचाही समावेश होतो. जिल्ह्यतील कोरोना व्हायरस प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार, उपाययोजना त्याचप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे आणि त्यांचे नियंत्रण करण्यासाठी या जाणकारांचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे काही निवडक जाणकार डॉक्टर आणि अभ्यासू मंडळींचा समावेश टास्क फोर्समध्ये होणार असल्याचे समजते.